साधकांनो, प्रत्येक क्षण साधनेसाठीच वापरून साधनेची फलनिष्पत्ती वाढवा आणि आध्यात्मिक उन्नतीचे ध्येय शीघ्र साध्य करा !

एकदा गेलेला वेळ पुन्हा मिळवता येत नाही’, या तत्त्वानुसार साधकांनी एकही क्षण न दवडता साधनेसाठी झोकून देऊन प्रयत्न करणे अपेक्षित आहे.

धरणक्षेत्रात रहाणार्‍यांनो, स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी सतर्क रहा !

‘शासनकर्त्यांनी विकासासाठी लहान आणि मोठी अनेक धरणे बांधली आहेत; पण सध्याच्या परिस्थितीत ही धरणे मानवासाठी धोक्याची बनली आहेत.

साधकांना निर्गुण स्थितीत जाण्यास साहाय्य करणारा ‘निर्विचार’ हा जप ऐकून काय जाणवते ? हे कळवा !

‘निर्विचार’ नामजप सनातन संस्थेच्या संकेतस्थळावर आणि ‘चैतन्य अ‍ॅप’ (सनातन चैतन्यवाणी)वर उपलब्ध !

साधकांनो, ‘कोरोना’ महामारीच्या कालावधीत, तसेच भीषण आपत्काळात मृत व्यक्तीवर अग्निसंस्कार करण्याच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्या !

या कठीण काळात ‘मृतावर अंत्यसंस्कार कसे करावेत ?’, याविषयी समाजात संभ्रमाची स्थिती आहे. यासाठी सांप्रतकाळाशी सुसंगत, असे आपत्कालीन पर्याय दिले आहेत.

कोरोना विषाणूविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्याकरता वैद्यकीय उपचारांसमवेत आध्यात्मिक बळ मिळण्यासाठी नामजप ध्वनीक्षेपकाद्वारे सर्वत्र लावण्याचे नियोजन करा !

कोरोना विषाणूचा प्रभाव जगभर असेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःचे आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी ‘श्री दुर्गादेवी, श्री दत्त आणि शिव’ या देवतांचा एकत्रित नामजप प्रतिदिन १ माळ (४० मिनिटे) करावा.

सनातनच्या रामनाथी आश्रमात लागवडीची सेवा करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता !

‘सनातनच्या रामनाथी आश्रम परिसरात विविध औषधी वनस्पती, फळे, फुले आदींची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. या संदर्भातील सेवांसाठी साधकांची आवश्यकता आहे.

‘कोरोना’च्या वाढत्या संसर्गामुळे मृत्यूभय निर्माण झाल्यास त्यावर शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून मात करा !

‘सध्या भारतासह अन्य काही राष्ट्रांत ‘कोरोना’ या संसर्गजन्य विषाणूंचा संसर्ग झाला आहे. अशा परिस्थितीत ‘लहानसहान कारणांनी मन विचलित होणे, काळजी वाटणे, अशी मनाची स्थिती होते. शारीरिक, मानसिक आणि नामजपादी उपाय करून या परिस्थितीवर मात करून मन स्थिर ठेवणे शक्य आहे.

‘हिंदु राष्ट्र’ : दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १९ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

‘निर्विचार’ नामजप सर्व टप्प्याच्या साधकांसाठी का आहे ?

प्रारंभीपासूनच ‘निर्विचार’ हा नामजप चालू केला, तर त्याच्या मनावर या नामजपाचा थोडाफार संस्कार लवकर होऊन आठ टप्प्यांची साधना करून पुढे मनोलयाच्या टप्प्याला जाण्यासाठी लागणार्‍या कालावधीच्या तुलनेत अल्प वेळेत तो या टप्प्याला पोचू शकतो.

‘ सात्त्विक आहार ‘ : दैनिक सनातन प्रभातचा रंगीत विशेषांक 

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !