‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या चालकांकडून फसवणूक झाल्याचे अनुभव आल्यास ते जनप्रबोधनासाठी कळवा !

साधकांना सूचना आणि वाचकांना आवाहन !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ९ जानेवारी २०२२ अंकाच्या पृष्ठ ५ वर ‘वाहनाची देखभाल-दुरुस्ती विनामूल्य करायची असतांना अतिरिक्त कामे करून ग्राहकांची फसवणूक करणारे सर्व्हिसिंग सेंटर चालक आणि फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकाने केलेले प्रयत्न’ याविषयीचा लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. या लेखानुसार ‘वाहन सर्व्हिसिंग सेंटर’च्या चालकांकडून खालील प्रमाणे फसवणूक केली जाते.

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ९ जानेवारी २०२२ च्या अंकातील लेख पुढील लिंकवर पाहू शकताhttps://sanatanprabhat.org/marathi/542295.html

१. वाहनाची तपासणी आणि दुरुस्ती विनामूल्य करायची असतांना ग्राहकांना घाबरवून अधिकची कामे काढणे

२. विनामूल्य तपासणी आणि दुरुस्ती असूनही १ सहस्र ७०० रुपयांचे अतिरिक्त देयक बनवणे

३. तसेच अन्य एका प्रसंगात सर्व्हिसिंग सेंटरमध्ये गाडी देखभाल-दुरुस्तीसाठी देतांना १० सहस्र रुपयांचे काम अतिरिक्त सांगितल्याचे लक्षात येणे

साधकांना सूचना आणि वाचकांना आवाहन !

सर्व्हिसिंग सेंटर चालकांकडून फसवणुकीच्या संदर्भात वरील प्रकारचे कोणतेही अनुभव कुणालाही आले असल्यास फसवणार्‍यांचे नाव पत्त्यासह कळवा. तसेच तुम्ही त्यासंदर्भात काही कार्यवाही केली असल्यास ते अनुभव पुढील पत्त्यावर कळवा. जनप्रबोधनासाठी आपल्या अनुभवांचा आम्हाला लाभ होईल.

अधिवक्ता नीलेश सांगोलकर,

संपर्क क्रमांक : ९५९५९८४८४४

ई-मेल पत्ता : [email protected]

पत्ता : ‘सुराज्य अभियान’, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा ४०१४०३.