आध्यात्मिक स्तरावरील उपायांसंदर्भात साधकांना सूचना !

‘सनातनचे संत, ६० टक्क्यांहून अधिक पातळीचे साधक आणि अन्य साधक त्यांना होणार्या शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक त्रासांसाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणून प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधतात. या पद्धतीनुसार कुंडलिनी शक्तीच्या प्रवाहातील अडथळे शोधून प्रत्यक्ष उपाय करतांना शोधलेल्या स्थानांवर मुद्रा करून न्यास करावा लागतो. त्या वेळी काही घंटे उपाय करायचे असल्यास हात दुखायला लागतात. आजारी, वयस्कर किंवा शारीरिक त्रास असणार्या साधकांना अशा प्रकारे शोधलेल्या स्थानावर मुद्रा करून न्यास करणे जमत नाही. अशा वेळी स्थुलातून अशा कृती न करता आपण शोधलेल्या स्थानावर मानस न्यास आणि मुद्रा करावा.’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१२.२०२१)
दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : गुरुकृपा
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांना सूचना : काल अमावास्या झाली.
साधकांना सूचना : आज अमावास्या आहे.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९३ वाचकांचे शेष नूतनीकरण ३१.७.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा !