सिंधुदुर्ग : केर, मोर्ले ग्रामस्थांचे २५ मे या दिवशीचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित

केर, मोर्ले परिसरात हत्तींची समस्या जटील झाली आहे. येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हत्तींना हटवणे, तसेच अन्य मागण्यांविषयी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थ त्रस्त आहेत.

देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !

उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी तळेगाव येथे ‘ठिय्या’ आंदोलन !

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे हत्या प्रकरणातील इतर आरोपींसह मुख्य सूत्रधारास तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी आवारे कुटुंबीय, नातेवाइक आणि कार्यकर्त्यांनी १७ मे या दिवशी काढणार असलेल्या मोर्च्यास पोलिसांनी अनुमती दिली नाही.

सिंधुदुर्ग : सावंतवाडी तालुक्यातील गौण खनिजाचे अवैध उत्खनन थांबवण्याची मनसेची मागणी

चिरे खाणीसाठी एका भूमीचा अहवाल दाखवून दुसर्‍याच भूमीत चिर्‍यांचे उत्खनन चालू आहे. या दोन्ही भूमींचा सातबारा वेगवेगळा आहे. एका व्यक्तीच्या अनुमतीवर एकाहून अधिक चिर्‍यांच्या खाणी चालू आहेत.

सातारा येथे शुद्ध पाण्यासाठी ‘चक्का जाम आंदोलन’ !

दीड मासापासून शहरातील पश्चिम भागात दूषित पाण्याचा पुरवठा नगरपालिकेकडून केला जात आहे. वारंवार सांगूनही शुद्ध पाणीपुरवठा केला जात नाही. याच्या निषेधार्थ ढोणे कॉलनी, मनामती चौक, रामाचा गोट परिसरातील नागरिकांनी मोती चौक येथे ‘चक्का जाम आंदोलन’ केले.

सिंधुदुर्ग : हत्तींची समस्या सोडवण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्याची चेतावणी

ही समस्या अनेक वर्षांची असून ती सोडवण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. सातत्याने होणार्‍या हानीमुळे ग्रामस्थ आणि शेतकरी यांचे मनोबलही खचले आहे.

सातारा शहरातील पश्चिम भागात किडे आणि अळ्यामिश्रित पाणीपुरवठा !

शहराच्या पश्चिम भागात गत ३ मासांपासून कधी गाळमिश्रित, तर कधी किडे, अळ्यामिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत.

गोवंशियांच्या हत्या करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास संपूर्ण तालुक्यात आंदोलन करणार !  

भर उन्हातून ग्रामस्थांना असे आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! राज्यात गोवंश हत्या बंदी असतांना प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? प्रशासनाने स्वत:हून गोहत्या करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

अवैधपणे होणारी अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात तातडीने कारवाई करा अन्यथा आंदोलन !

प्रशासनाला अशी चेतावणी का द्यावी लागते ? खरे तर प्रशासनानेच स्वत:हून अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करायला हवी !

जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ

या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.