जम्मूच्या वैद्यकीय महाविद्यालयात ‘द केरल स्टोरी’वरून विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी : ५ जण घायळ

जम्मू (जम्मू-काश्मीर) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये १४ मेच्या रात्री ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावरून २ गटांतून हाणामारी झाली. यात एक तरुण घायाळ झाला. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी १५ मे या दिवशी आंदोलनही केले.


१. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यास गटात विद्यार्थ्यांनी चित्रपट पहाण्याविषयी काही प्रतिक्रिया दिल्या. यानंतर वाद वाढला. यावरून नंतर विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यांनतर झालेल्या हाणामारीमध्ये ५ विद्यार्थी घायाळ झाले. या प्रकरणी महाविद्यालयाने १० विद्यार्थ्यांना २ मासांसाठी वसतीगृहातून निलंबित केले आहे.

२. या प्रकरणाविषयी पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, केंद्र सरकार हिंसाचार आणि द्वेष वाढवणार्‍या चित्रपटांना प्रोत्साहन देत आहे. (चित्रपटातून सत्य माहिती दाखवली, तर धर्मांध राजकारण्यांना पोटशूळ उठतो, हे लक्षात घ्या ! – संपादक)

भाजप छोट्या लाभासाठी निरपराधांचे रक्त सांडत आहे. राज्यपालांनी या प्रकरणी कारवाई करावी आणि दोषींना शिक्षा करावी, अशी मी विनंती करते.