देहलीतील शाळेत हिंदु मुलांच्या मनगटावरील लाल दोरे कापणार्‍या शिक्षकांचे आंदोलनानंतर निलंबन !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – येथील मयूर विहार भागातील ‘वनस्थली पब्लिक स्कूल’ या शाळेत हिंदु विद्यार्थ्यांच्या मनगटावर बांधलेला लाल दोरा कापून टाकण्याची आणि जय श्रीरामच्या घोषणा देणार्‍या ९ विद्यार्थ्यांना निलंबित करण्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शाळेबाहेर निदर्शने केल्यानंतर विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्यात आले.

विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षक अनूप रावत यांनी विद्यार्थ्यांच्या मनगटावरील लाल दोरा कापल्याचे सांगितले. यासह शिक्षक रवि यांनी भगवान श्रीराम यांचे चित्र असलेले भित्तीपत्रक काढले होते, तर रितू नावाच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शिक्षाही केली होती, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. काही विद्यार्थ्यांचे या संदर्भात माहिती देणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतर वरील तिन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. यांतील रितू ही शिक्षिका ख्रिस्ती आहे. या शाळेचे संचालक रोहित जैन आणि मुख्याध्यापिका अनुराधा जैन या आहेत. वर्ष २००२ मध्ये ही शाळा चालू झाली आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारची कृती करणार्‍यांना आता कठोर शिक्षा करण्याचा कायदा केला पाहिजे, तरच अशा घटनांवर चाप बसेल !