यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री यांना विविध समस्यांचे निवेदन !

खासगी आणि शासकीय रुग्णालयातील कोरोनाच्या रुग्णांची गैरसोय, पाणीटंचाई, खासगी शाळांच्या शुल्कात ५० टक्के सवलत, घनकचरा व्यवस्थापन, कोरोना काळातील वीजदेयक रहित करावे, शेतमालाला योग्य भाव द्यावा ………

यवतमाळ येथे बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसंदर्भातील तक्रारींच्या निवारणार्थ नियंत्रण कक्ष कार्यान्वित !

 बियाणे पेरणीचा कालावधी अत्यंत अल्प असल्याने शेतकरी, बियाणे आस्थापनांचे प्रतिनिधी, कृषी निविष्ठा विक्रेते यांच्या अडचणी आणि तक्रारी यांचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

नवीन शैक्षणिक धोरण राबवतांना अनुदानित शाळांचे व्यवस्थापन सरकार कह्यात घेणार नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. धोरण राबवतांना पहिल्या टप्प्यात पूर्वप्राथमिक स्तरावर ‘फाऊंडेशन कोर्सेस’ प्रारंभ करण्यात येणार आहेत….

कृषी कायद्यांना विरोध करणार्‍या शेतकर्‍यांचे आज भारत बंद आंदोलन

गेल्या ४ मासांपासून देहलीच्या सीमेवर केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनी उद्या २६ मार्च या दिवशी भारत बंदचे आयोजन केले आहे. त्यांच्या आंदोलनाला १२० दिवस झाल्याच्या निमित्ताने हा बंद आयोजित करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांचे खच्चीकरण थांबवा !

१० मार्च या दिवशी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर महावितरणने पुन्हा थकित वीजदेयकांची धडक वसुली मोहीम चालू केली आहे. या मोहिमेचा फटका वीजदेयके थकवणार्‍या शेतकर्‍यांनाच नव्हे, तर नियमित वीजदेयके भरणार्‍या शेतकर्‍यांनाही बसत आहे.

चुकीचे वर्णन करून मतपेटीचे राजकारण करणे ब्रिटीश खासदारांनी टाळावे ! – भारताने ब्रिटनच्या उच्चायुक्तांना सुनावले

ब्रिटिशांना भारतातून हाकलले; मात्र भारतावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी त्यांच्यात अजूनही दिसून येते. ब्रिटनला समजेल, अशा भाषेत भारताने प्रत्युत्तर दिले पाहिजे !

शेतकर्‍यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी पीक कर्ज आणि महिलांसाठी ‘राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना’

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत महाविकास आघाडी शासनाचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प १० सहस्र २२६ कोटी रुपये तुटीचा आहे.

शेतकर्‍यांच्या आंदोलनासाठी आयोजित काँग्रेसच्या ‘जन आक्रोश सभे’त हिंदी चित्रपटातील गाण्यांवर नृत्य

काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्‍यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !

७१ वर्षांत शेतकर्‍यांच्या हिताचे कायदे न करणारे विद्यमान विरोधी पक्ष आणि मवाळ धोरणे अवलंबून शेतकरी आंदोलनाचा विषय चिघळू देणारे विद्यमान सत्ताधारी !

आज ७० दिवस झाल्यानंतरही हे आंदोलन जाणीवपूर्वक चालू ठेवले आहे. ‘देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या दृष्टीने अशी आंदोलने कठोरपणे मोडून काढावीत.

काँग्रेसचे बेगडी शेतकरीप्रेम जाणा !

झारखंडमध्ये शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसकडून ‘जन आक्रोश सभे’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य करण्यात आले, तेव्हा मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारीही उपस्थित होत्या.