वणी (यवतमाळ) येथे अपुर्‍या पावसामुळे शेतकर्‍यांवर दागिने गहाण ठेवण्याची वेळ !

प्रतिकात्मक छायाचित्र

वणी (यवतमाळ), ३० जून (वार्ता.) – पाऊस नाही, दुबार पेरणीचे संकट, योग्य बियाणे उपलब्ध नाही, तसेच प्रशासनाचे साहाय्य नाही यांमुळे येथील शेतकरी त्रस्त आहेत. शेतकर्‍यांवर वडिलोपार्जित सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे, असे काही शेतकर्‍यांनी सांगितले.