अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून इंधनाची खरेदी
नवी देहली – जागतिक निर्बंध आणि भू-राजकीय दबाव असूनही भारतीय तेल शुद्धीकरण आस्थापनांनी रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची खरेदी आणखी वाढवली आहे. ‘युरोपीयन थिंक टँक’ आणि ‘सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’ (सी.आर्.इ.ए.) यांच्या अहवालानुसार भारताने मे मासात रशियाकडून अनुमाने ५.८ अब्ज युरो (६३ सहस्र ८१७ कोटी रुपये) किमतीचे इंधन आयात केले. यामुळे भारत चीननंतर रशियाकडून इंधन खरेदी करणारा जगातील दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार बनला आहे. रशियाकडून तेलखरेदी न करण्याचा सल्ला देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या दबावाला न जुमानता भारताची एकूण कच्च्या तेलाची आयात मे मासात मागील मासाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी वाढली आहे.
१. गुजरातमधील जामनगर आणि वाडीनार यांसारख्या प्रमुख तेलशुद्धीकरण केंद्रांनी, तसेच सरकारी तेल आस्थापनांनी या काळात रशियाच्या कच्च्या तेलाची आयात लक्षणीयरित्या वाढवली.
२. मे मासात रशियाकडून भारताने केलेल्या एकूण आयातीपैकी अनुमाने ८३ टक्के आयात कच्च्या तेलाची होती, ज्याचे मूल्य ४.८ अब्ज युरो (५२ सहस्र ८१४ कोटी रुपये) होते, तर तेल उत्पादने आणि कोळशाची आयात अनुक्रमे ५५० दशलक्ष युरो (६ सहस्र ५२ कोटी रुपये) आणि ४२९ दशलक्ष युरो (४ सहस्र ७२१ रपये) इतकी होती.
३. सी.आर्.इ.ए.च्या मते, या वर्षाच्या आरंभी आयात पुन्हा चालू केल्यानंतर सरकारी मालकीच्या तेल शुद्धीकरण आस्थापनांनीही खरेदी वाढवली. ‘न्यू मंगळूर रिफायनरी’ आणि ‘विशाखापट्टणम् रिफायनरी’ यांनी नोव्हेंबर २०२५ च्या शेवटी रशियाकडील कच्च्या तेलाची आयात थांबवली होती. याच आस्थापनांनी मार्चमध्ये रशियाकडून तेलखरेदी करणे चालू ठेवले.
४. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर पाश्चात्त्य देशांनी लादलेले निर्बंध आणि व्यापारबंदी, यांमुळे जागतिक ऊर्जा प्रवाहात पालट झाल्यापासून भारत रशियाकडून तेलाच्या सर्वांत मोठ्या खरेदीदारांपैकी एक बनला आहे. भारतीय तेल शुद्धीकरण आस्थापनांनी सवलतीच्या दरात मिळणार्या रशियाच्या कच्च्या तेलाची खरेदी सातत्याने वाढवली आहे, ज्यामुळे वाढलेला ऊर्जा खर्च भरून काढण्यास आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यास साहाय्य झाले आहे.

Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan