
सातारा, २७ जून (वार्ता.) – जिल्ह्यातील सर्व अधिकोषांना शाखांनुसार खरीप हंगामात पात्र शेतकऱ्यांना कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. हे उद्दिष्ट अधिकोषांनी पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सर्व अधिकोष अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. तेव्हा ते बोलत होते. जिल्हाधिकारी सिंह पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना कर्ज काढण्यात काही अडचणी येत असतील, तर त्यांनी कृषी विभागाकडून माहिती घ्यावी. कृषी विभागानेही शेतकऱ्यांना कर्ज प्रकरणासाठी योग्य मार्गदर्शन करावे. लघुउद्योजकांसाठी कर्जाची मागणी मोठी नसते. त्यामुळे लघुउद्योजकांसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे संमत करावीत. तसेच अधिकाधिक बचत गटांची कर्ज प्रकरणे संमत करण्यात यावीत.
थोडक्यात महत्त्वाचे (१५.०६.२०२६)
टिटवाळा येथे भूमाफियांच्या टोळीकडून वृद्धेच्या घरात घुसून तोडफोड !
नसरापूर खटल्याचा निकाल अंतिम टप्प्यात !
मंगळवेढ्यात खताच्या नावाखाली मिठाची विक्री !
सबळ कारणाअभावी १५ शस्त्र परवाने रहित केले !
नव्या शालेय वेळापत्रकात इयत्ता १ ली ते ८ वीसाठी तिसर्या भाषेचा समावेश नाही !