विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !

  • ‘लव्ह जिहाद’चे पर्यावसान

  • कुटुंबियांचा युवतीचा बुद्धीभेद केला गेल्याचा आरोप

कानपूर (उत्तरप्रदेश) – ‘आपण हिंदु आहोत, जरा शहाणपणाची गोष्ट समजून घे’, असे स्वत:च्या विवाहित बहिणीला समजावूनही तिने तिच्या मुसलमान प्रियकराशी बोलणे थांबवले नाही. यामुळे राग अनावर झालेल्या संदीप नावाच्या भावाने बहिणीची गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर भावाने स्वत:ला पोलिसांकडे स्वाधीन केले. मृत बहिणीचे काही कालावधीपूर्वीच लग्न झाले होते. तिचा प्रियकर हा मुसलमान समाजातील कसाई असल्याची माहिती संदीपने पोलिसांना दिली. यासंदर्भात मुलीच्या कुटुंबियांनी पीडितेचा मुसलमान प्रियकराने बुद्धीभेद केल्याचा आरोप केला आहे.

हत्या केलेल्या भावाने दिली गुन्ह्याची स्वीकृती !

संदीपने पोलिसांना सांगितले, ‘‘मी बहिणीला सांगत असे की, आपण हिंदु आहोत. दुसर्‍या धर्मात लग्न होणे शक्य नाही. आता तुझे लग्नही झाले आहे. तू तुझ्या पतीच्या घरची ‘लक्ष्मी’ आहेस. तिथेच रहा आणि आनंदी आयुष्य जग. अगं, जरा शहाणपणाची गोष्ट समजून घे. तुझ्या प्रियकराकडे जाण्याचा विचारही करू नकोस.’ मी माझ्या बहिणीला समजावण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. जेव्हा तिने ऐकले नाही, तेव्हा मी तिचा गळा आवळला आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.’’