
धारवाड (कर्नाटक) – तालुक्यातील गरग गावात एक अल्पवयीन मुलगी लव्ह जिहादच्या प्रकरणात अडकली होती. नहीम बेग आणि सोहेल मुल्ला यांनी तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिची अश्लील छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित केल्याने तिने आत्महत्या केली. या प्रकरणी गरगचे पोलीस निरीक्षक शिवयोगी लोहार यांनी कोणतीच कारवाई न करता हे प्रकरण दडपले. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी या प्रकरणी आंदोलन करून नहीम आणि सोहेल यांना ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत त्वरित अटक करून दोघांना फाशी होण्यासाठी आवश्यक कलमे लावावीत, अशी जोरदार मागणी केली. यानंतर धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी लोहार यांना निलंबित केले.
१. गेल्या महिन्यात, ८ मे या दिवशी अल्पवयीन पीडितेने आत्महत्या केली. हे ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण असल्याचा आरोप तेव्हापासून केला जात होता; परंतु या संदर्भात तातडीने गुन्हा न नोंदवता पोलीस निरीक्षक लोहार यांनी हे प्रकरण दडपण्यासाठी तडजोड घडवून आणली होती, असा गंभीर आरोप करण्यात आला.
२. बजरंग दल, श्रीराम सेना, विहिंप आदी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी १२ जूनला गरग गावात मोठे आंदोलन केले आणि दोषी पोलीस अधिकार्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी कारवाई करत लोहार यांना निलंबित केले.
३. बर्याच वेळ हिंदु कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षेसाठी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
४. यावेळी अनेक हिंदु कार्यकर्ते आणि नेत्यांनी राज्यातील काँग्रेस सरकार, गृहमंत्री प्रियंक खर्गे आणि पोलिसांवर जोरदार निशाणा साधला. ‘एका हिंदु मुलीचा लव्ह जिहादसाठी वापर करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या मुसलमान तरुणांना पोलिसांनी अनेक दिवस अटक केली नव्हती. आता त्यांना अटक करण्यात आली असून, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे’, अशी मागणी त्यांनी केली.
५.आंदोलनस्थळी पोचलेल्या जिल्हा पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले. सध्या हे प्रकरण डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन’ (डीसीआरई) अर्थात् नागरी हक्क संरक्षण संचालनालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. ‘या अन्वेषण पथकाचे अधिकारी या प्रकरणाचा आणखी सखोल अन्वेषण करत असून, यामध्ये आणखी कुणाचा समावेश आहे का, याची माहिती जर मुलीच्या पालकांनी दिली, तर त्यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवून निष्पक्षपातीपणे अन्वेषण जाईल’, असे गुंजन आर्य यांनी सांगितले.
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
गेल्या १२ वर्षांत आरोग्यसेवा लोकांना परवडेल आणि सहज उपलब्ध होईल यांसाठी महत्त्वपूर्ण कार्य ! – PM Modi
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah