मारळ ग्रामस्थांनी केला कामाला तीव्र विरोध : प्रशासनाकडे ठेकेदारावर कारवाई करण्याची केली मागणी

संगमेश्वर – तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्लेश्वर मंदिर परिसरामध्ये सध्या चालू असलेल्या पुलाच्या कामासाठी ठेकेदाराकडून अवैधरित्या तीव्र स्वरूपाचे सुरुंग स्फोट केले जात आहेत. या स्फोटांमुळे येथील गुहेला तडे जात असून मंदिरालाही धोका उत्पन्न झाला असल्याने मारळ येथील ग्रामस्थांनी या कामाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकरणी ठेकेदारावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे.
नेमके प्रकरण काय ?
मार्लेश्वर येथील श्री दत्त मंदिराकडे जाण्यासाठी सध्या नदीपात्रात एका पुलाचे काम चालू आहे. हे काम करणार्या संबंधित ठेकेदाराने नदीपात्रात आणि डोंगराच्या भागात पाया खोदण्यासाठी सुरुंग लावले आहेत. सुरुंगाच्या या स्फोटांमुळे सह्याद्रीच्या संवेदनशील डोंगररांगांना आणि गुहेला मोठे हादरे बसत आहेत. या सततच्या स्फोटांमुळे गुहेच्या छताला आणि परिसरातील दगडांनाही तडे गेले आहेत. या स्फोटांमुळे डोंगरभागातील दगड आणि सुळके सैल होऊन खाली कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
सुरुंग लावण्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध
‘या गंभीर प्रकाराविषयी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अभियंत्यांना वारंवार सूचित करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही’, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. ‘पर्यावरणालाही धोका होईल, अशा या स्फोटांना प्रशासनाने अनुमती दिलीच कशी ?’, असाही प्रश्न मंदिराचे पुजारी योगेश लिंगायत, विजय लिंगायत, प्रसाद सावंत, बाळकृष्ण ब्रीद यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात मारळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन हे स्फोट तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
लोकसभा अध्यक्षांकडून कुंभपर्वाचा आढावा