पुरातत्व विभागाचा निष्काळजीपणा !

फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) – गेल्या वर्षी जिल्ह्यातील कोटला येथे असलेल्या वनखंडेश्वर महादेव मंदिरात उत्खननाच्या वेळी ४० किलोहून अधिक वजनाची कुषाणकालीन नाणी सापडली होती. किमान २ सहस्र वर्षे जुनी असल्याचा अनुमान असलेली ही नाणी तांबा धातूने बनवलेली होती. पुरातत्व विभागाने ती नाणी मंदिराच्या एका खोलीत ठेवली. ही नाणी नंतर संग्रहालयात पाठवली जातील, असे विभागाच्या पथकाने सांगितले होते. पुरातत्वदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली ही नाणी आता गायब झाली आहेत. उत्तरप्रदेश राज्य पुरातत्व विभागाच्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाण्यांची पहाणी करण्यासाठी एक पथक आले असता मंदिराच्या खोलीत ती न आढळल्याने ती चोरीला गेल्याचे उघड झाले.
संपादकीय : ‘इस्रो’पुढील आव्हाने !
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण