५० सहस्र रुपयांची लाच घेतांना झाली कारवाई
ठाणे, २ जून (वार्ता.) – भिवंडी येथील नायब तहसीलदार सिंधू उमेश खाडे यांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कह्यात घेतले आहे. भूमीच्या फेरफार नोंदणी प्रकरणाचा अंतिम अहवाल आणि त्याची प्रत देण्यासाठी सिंधू यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाचेचा पहिला हप्ता घेतांना ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी भिवंडी येथील शांतीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (अशा लाचखोरांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)