परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या दिवशी रथात विराजमान असलेल्या सनातनच्या तीनही गुरूंचे दर्शन होणे, ही साधकांना मिळालेली अनमोल भेटच !
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘न भूतो न भविष्यति ।’ म्हणजे ‘असे पूर्वी कधी झाले नाही आणि यापुढे कधी होणार नाही’, असा हा डोळ्यांचे पारणे फिटणारा सोहळा अनुभवण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरीही ती अल्पच आहे.