हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने आजपासून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’चे आयोजन !

द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने समितीचे धर्मप्रसाराचे कार्य, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे ध्येय अधिक व्यापक प्रमाणात समाजात पोचवण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ देशभर राबवण्यात येणार आहे. हे अभियान ३१ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विविध उपक्रमांद्वारे राबवण्यात येईल.

सार्वजनिक श्री गणेशोत्सवात हे टाळा !

• अविघटनशील ‘थर्माेकोल’चा वापर टाळा !
• जुगार, मद्यपान आदी अपप्रकार टाळा !

सार्वजनिक गणेशोत्सव ही हिंदूसंघटनाची संधीच !

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्मच हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी झाल्याने लोकमान्य टिळक यांच्या दूरदृष्टीची जाणीव ठेवून हिंदूंनी स्वतःमध्ये क्षात्रवृत्ती आणि संघटन यांची जागृती करण्यासाठीच याचा लाभ उठवणे आवश्यक आहे.

श्री गणेशचतुर्थी व्रताविषयी काही प्रश्न आणि उत्तरे !

शाडूची मूर्ती बनवतांना त्यात बी ठेवावे आणि नंतर मूर्ती कुंडीत विसर्जित करावी हे शास्त्रसंमत आहे का ?

विघ्नहर्ता श्री गणेश !

सर्वच देवता भक्तांच्या हाकेला धावून येतात; परंतु श्री गणेशाचे एक नावच ‘विघ्नहर्ता’ असे आहे; म्हणूनच कि काय संकटकाळी ‘गणपति पाण्यात ठेवून’ बसतात. ‘विघ्नेश’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ.

चूक आणि सुधारणा

२८ ऑगस्ट २०२२ या दिवशीच्या ‘श्री सिद्धिविनायक विशेषांका’त पृष्ठ ६ वर ‘श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातील ‘५ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ’ यातील देशकाल आणि संकल्प चुकीचा प्रसिद्ध झाला आहे. या चुकीसाठी क्षमस्व ! उत्तरदायी कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत.

आजचा वाढदिवस : चि. संस्कृती खांदेल

भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी यवतमाळ येथील चि. संस्कृती मंगेश खांदेल हिचा २ रा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई-वडील आणि साधक यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

आजचा वाढदिवस : कु. सिद्धी बाबते

भाद्रपद शुक्ल चतुर्थी (श्री गणेशचतुर्थी) (३१.८.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील हिचा १२ वा वाढदिवस आहे. कु. सिद्धी बाबते हिच्या आईला लक्षात आलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

सनातनच्या आश्रम परिसरातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धीविनायकाच्या मूर्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमागील अध्यात्मशास्त्र !

‘१०.३.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ऋद्धि-सिद्धिसहित श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीवर टप्प्याटप्प्याने प्रकाश पडल्याने मूर्ती अधिकाधिक तेजस्वी दिसत होती. आश्रमाच्या बांधकामाच्या रचनेनुसार या मूर्तीवर प्रत्यक्ष सूर्यकिरण येऊ शकत नाहीत..

गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशाचा नामजप करा !

श्री गणेशचतुर्थीला, तसेच गणेशोत्सवाच्या काळात, म्हणजे अनंत चतुदर्शीपर्यंत गणेशतत्त्व पृथ्वीवर नेहमीपेक्षा १ सहस्रपटीने कार्यरत असते. गणेशतत्त्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी ‘ॐ गँ गणपतये नम: ।’ हा जप सतत करा.