चूक आणि सुधारणा

२८ ऑगस्ट २०२२ या दिवशीच्या ‘श्री सिद्धिविनायक विशेषांका’त पृष्ठ ६ वर ‘श्री गणेशाच्या पूजेची सिद्धता आणि पूजाविधी’ हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यातील ‘५ उ. ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ यांचा अर्थ’ यातील देशकाल आणि संकल्प चुकीचा प्रसिद्ध झाला आहे. या चुकीसाठी क्षमस्व ! उत्तरदायी कार्यकर्ते या चुकीसाठी प्रायश्चित्त घेत आहेत. – संपादक

** सुधारित ‘देशकाल’ आणि ‘संकल्प’ **

महापुरुष भगवान श्रीविष्णूच्या आज्ञेने प्रेरित झालेल्या या ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या परार्धामधील विष्णुपदातील श्रीश्वेतवाराह कल्पामधील वैवस्वत मन्वंतरामधील अठ्ठाविसाव्या युगातील चतुर्युगातील कलियुगाच्या पहिल्या चरणातील जम्बु द्वीपावरील भरतवर्षामध्ये भरत खंडामध्ये दंडकारण्य देशामध्ये गोदावरी नदीच्या दक्षिण तटावर बौद्धावतारात रामक्षेत्रात सध्या चालू असलेल्या शालिवाहन शकातील व्यावहारिक शुभकृत् नावाच्या वर्षातील दक्षिणायनातील वर्षा ऋतूतील भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी या तिथीला बुधवारी चित्रा नक्षत्रातील शुक्ल योगातील (२२.४७ नंतर ब्रह्मा योगातील) विष्टी करणातील (१५.२२ नंतर बव करणातील) चंद्र कन्या (१२.०४ नंतर तुला) राशीत असतांना, सूर्य सिंह राशीत असतांना, गुरु मीन राशीत असतांना आणि शनि मकर राशीत असतांना या शुभघडीला ग्रहगुणविशेषांनी युक्त शुभ आणि पुण्यकारक अशी आज तिथी आहे. सर्व शास्त्रे आणि श्रुती-स्मृती-पुराणे ही मला परमेश्वराच्या आज्ञेसारखी आहेत. यांत सांगितलेले फळ मला मिळावे आणि परमेश्वराने माझ्यावर प्रसन्न व्हावे, यासाठी मी हे पूजन करत आहे.