सार्वजनिक गणेशोत्सव ही हिंदूसंघटनाची संधीच !

सार्वजनिक गणेशोत्सव

सार्वजनिक गणेशोत्सवाचा जन्मच हिंदूंच्या एकत्रीकरणासाठी झाल्याने लोकमान्य टिळक यांच्या दूरदृष्टीची जाणीव ठेवून हिंदूंनी स्वतःमध्ये क्षात्रवृत्ती आणि संघटन यांची जागृती करण्यासाठीच याचा लाभ उठवणे आवश्यक आहे. राष्ट्र आणि धर्म संकटात असतांना उत्सवाला आलेले मनोरंजनाचे स्वरूप हिंदूंची शक्ती व्यर्थ दवडणारे आहे. भक्तीचा जागर करण्यासाठी एकत्र आलेल्या हिंदूंमध्ये त्यांच्यावर आणि राष्ट्रावर होणार्‍या आघातांविषयी गांभीर्य निर्माण करून ते रोखण्यासाठी प्रवृत्त करणे, हीच खरी श्री गणेशाची उपासना ! हिंदूंना ‘सर तन से जुदा’च्या धमक्या दिल्या जात असतांना हिंदूंची तरुण पिढी नृत्य आणि संगीत खुर्ची खेळत उत्सव साजरा करण्यात व्यग्र झाली आहे, हे दुर्दैवी ! उत्सवाच्या निमित्ताने संघटित युवक-युवतींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग आयोजित करणे, लव्ह जिहाद, हलाल प्रमाणपत्र, धर्मांतर यांसारख्या हिंदूंवरील आघातांच्या संदर्भात जागृती करणारी व्याख्याने ठेवणे, श्री गणेशाचा सामूहिक नामजप करणे असे केल्यासच सार्वजनिक गणेशोत्सवाचा उद्देश सफल होईल !