उच्च न्यायालयाने तपास ‘ए.टी.एस्.’कडे वर्ग केल्याच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी २३ ऑगस्टला !

उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत उपलब्ध न झाल्याने दोष निश्चितीसाठी पुढील सुनावणी आता २३ ऑगस्टला होणार आहे. ही सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू असून संशयितांच्या वतीने अधिवक्ता समीर पटवर्धन हे काम पहात आहेत.

अतीवृष्टीमुळे बाधित होणार्‍या ग्रामीण भागांतील पुलांच्या अभ्यासासाठी शासनाकडून समिती गठीत !

पावसाळ्याच्या कालावधीमध्ये विशेषत: ग्रामीण भागांत अतीवृष्टीमुळे पूल वाहून जातात. काही वेळा पुलावरून पाणी जाते. यांमुळे पुलाला जोडणार्‍या दोन्ही बाजूंचे रस्ते बाधित होऊन पुलावरील वाहतूक बंद होते.

नागपूर येथे ‘स्वाईन फ्ल्यू’च्या संसर्गात वाढ, तिघांचा मृत्यू !

शहरात ‘स्वाईन फ्ल्यू’चा संसर्ग वाढत असून शहरातील विविध रुग्णालयांत या आजाराचे ४६ रुग्ण भरती झाले आहेत, तर आतापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला असून दोघे ‘व्हेंटिलिटर’वर आहेत, अशी माहिती महापालिकेने ५ ऑगस्ट या दिवशी दिली आहे.

मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी !

मागील ३ वर्षांपासून बंद असलेली ‘मिरज-परळी वैद्यनाथ-मिरज रेल्वे चालू करावी’, या मागणीचे निवेदन ‘हुतात्मा अशोक कामटे’ या बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने मध्य रेल्वे विभाग, सोलापूर यांना देण्यात आले.

गोंदिया येथे धर्मप्रेमींकडून शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन !

राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू आहेत. त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवली जाते.

नाशिक येथे १ सहस्र सेवेकर्‍यांकडून रामकुंड परिसरात गोदावरीची स्वच्छता !

‘अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्ग’ आणि ‘गुरुपीठ त्र्यंबकेश्वर’ अंतर्गत ‘सक्रिय आरोग्यदूत’ अभियानाच्या वतीने गंगा गोदावरी स्वच्छता, गरजूंना वस्त्रदान, आरोग्य पडताळणी अन् विनामूल्य औषधोपचार अशी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

‘मुंबई बँके’च्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड !

मविआच्या काळात बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची, तर उपाध्यक्षपदी विठ्ठल भोसले यांची निवड करण्यात आली होती. सत्तापालटानंतर दोघांनीही अचानक राजीनामे दिले होते.

संभाजीनगर येथील पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागणीसाठी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे महापालिकेच्या बाहेर ‘आमरण उपोषण’ !

शहरात भीषण पाणीप्रश्न असतांना महानगरपालिकेने मागील १० वर्षांत अर्थसंकल्पात पाण्यासाठी अत्यल्प तरतूद केली होती. चालू वर्षीही त्याचीच पुनरावृत्ती होत आहे. त्यामुळे सिमेंटच्या रस्त्यांसह इतर गोष्टींवर होणारा व्यय अल्प करून तो शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी करण्यात यावा

पुणे येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपीसह त्याच्या आईलाही अटक !

विकृत नराधमांना आणि त्यांना साहाय्य करणार्‍यांनाही त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल !

भाजप आणि मनसे दहीहंडी उत्सवातील गोविंदांचा १० लाख रुपयांचा विमा उतरवणार !

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सवात सहभागी होणार्‍या गोविंदांना भाजपने राज्यस्तरावर, तर मनसेने नवी मुंबई स्तरावर १० लाख रुपयांचा विमा कवच देण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे आणि मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.