संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन !

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे गैरप्रकार थांबवण्याविषयी अभियान

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ डिसेंबर या दिवशी करण्यात आले.

पुणे येथे २३३ कोटींची खोटी देयके देणार्‍या धर्मांध व्यापार्‍यास अटक !

अल्पसंख्य म्हणवणारे धर्मांध फसवणूक, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार अशा सर्वच गैरप्रकारांत आघाडीवर असणे, हे देशासाठी घातक आहे. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे.

कोरोनाची तिसरी लाट येणार ?

गेले १ वर्षे १० मास कोरोनाशी झुंज देत असतांना जगभरातील देशांची कोरोना विषयत परिस्थिती निवळल्याने थोडा विसावा मिळतो न मिळतो, तोच ‘ओमिक्रॉन’चे (कोरोनाचा एक प्रकार) नवे संकट उभे राहिले आहे.

उत्तरदायी घटकांचे दायित्वशून्य वर्तन !

न्याययंत्रणा ही देशाच्या ४ प्रमुख स्तंभांपैकी एक यंत्रणा आहे. त्यामुळे या यंत्रणेशी संबंधित प्रत्येक घटकाने दायित्वाने वर्तन करायला हवे. गेल्या काही दिवसांत याच न्याययंत्रणेचे घटक असणार्‍या अधिवक्त्यांचे मात्र लज्जास्पद वर्तन समोर येत आहे.

भगवंताच्या नामस्मरणात अनंत ताकद ! – डॉ. इंद्रजित देशमुख

गत २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु वारकरी संप्रदायाने या काळात जिद्द, चिकाटी, जिज्ञासा आणि भगवंताच्या नामस्मरणाच्या जोरावर कोरोनाचा सामना केला आहे.

आश्वासन देऊनही अभियांत्रिकीची बनावट पदविका घेतलेल्या कर्मचार्‍यांची चौकशी चालू केली नाही ! – आम आदमी पक्षाचा आरोप

मान्यता नसलेल्या संस्थांमधून अभियांत्रिकीची बनावट पदविका मिळवून काही कर्मचार्‍यांनी महापालिकेत पदोन्नती मिळवली असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर महापौरांनी आश्वासन देऊनही प्रशासनाने चौकशी चालू केली नाही.

हलाल अर्थव्यवस्थेच्या विरोधात कृतीशील होण्याचा पुणे येथील राष्ट्र आणि धर्म प्रेमी महिलांचा निर्धार !

येथील जिज्ञासू श्री. राजेंद्रजी लुंकड यांच्या धर्मपत्नी सौ. कमल लुंकड यांच्या संपर्कातील महिलांसाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ या विषयासंदर्भात जागृती करण्यासाठी एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

ऊस देयकातून शेती पंपाची वीजदेयके वसूल करा ! – रामराजे नाईक-निंबाळकर, सभापती, विधानपरिषद

रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘‘तालुक्यातील वीजपंपाची जोडणी तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. विद्युत् जनित्राचाच वीजपुरवठा खंडित केल्यामुळे नियमित वीजदेयके भरणार्‍यांवर अन्याय होत आहे.

सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावे ‘फेसबूक’वर बनावट खाते सिद्ध करून पैशांची मागणी केल्याच्या प्रकरणी राजस्थानमधील एकाला अटक !

देवकरण हनुमानसिंग रावत आणि मोनुकुमार नथुसिंग पाल, अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.