पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन !

कोल्हापूर, २२ डिसेंबर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ डिसेंबर या दिवशी करण्यात आले. या दिनदर्शिकेत मंदिरातील अलंकार पूजा यांची चित्रे, सिद्धिविनायक मंदिर, जोतिबा मंदिर, टेंबलाई मंदिर, दत्त भिक्षालिंग, किरणोत्सव सोहळा, नवरात्र सोहळा अशी छायाचित्रे आहेत. याचे नाममात्र मूल्य ५० रुपये ठेवण्यात आले असून ही दिनदर्शिका श्री महालक्ष्मी मंदिर, श्री दत्तभिक्षालिंग मंदिर, श्री केदारलिंग जोतिबा देवस्थान, ओढ्यावरील श्री सिद्धिविनायक मंदिर येथे विक्रीसाठी उपलब्ध आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची दिनदर्शिका