प्रारब्धावर ‘साधना’ हाच एकमेव उपाय !
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
कुणालाही साहाय्य करतांना त्याच्या मुख्य अडचणी प्रारब्धामुळे आल्या आहेत, हे लक्षात घेऊन त्याला साधना करण्यासही सांगावे. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘व्यवहारात अधिकाधिक कमावणे असते, तर साधनेत सर्वस्वाचा त्याग असतो; म्हणून व्यवहारातील माणसे दुःखी असतात, तर साधक आनंदी असतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘इतर नियतकालिकांत मुलांची वाढदिवसाची छायाचित्रे विज्ञापनाचे पैसे देऊन छापण्यात येतात, तर ‘सनातन प्रभात’मध्ये गुणवंत मुलांच्या छायाचित्रांसह त्यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्येही छापण्यात येतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘युगानुयुगे संस्कृत व्याकरण तेच आहे. त्याच्यात कुणीच काहीच पालट केलेला नाही. याचे कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे. याउलट जगातील सर्वच भाषांतील व्याकरण पालटत असते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘देव सर्वत्र आहे, प्रत्येकात आहे’, ही हिंदु धर्माची शिकवण असल्यामुळे हिंदूंना इतर पंथियांचा द्वेष करायला शिकवले जात नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘नोबेल पारितोषिक मिळवणार्यांची नावे काही वर्षांतच विसरली जातात; पण धर्मग्रंथ लिहिणारे वाल्मीकि ऋषि, महर्षि व्यास, वसिष्ठ ऋषि इत्यादींची नावे युगानुयुगे चिरंतन रहातात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘धर्म त्याग शिकवतो, तर राजकारण स्वार्थ शिकवते; म्हणून भ्रष्टाचार इत्यादी प्रकार वाढत गेले आहेत. यावर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे सर्वांना सर्वस्वाचा त्याग शिकवणारी साधना शिकवणे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
. . . त्यामुळे जगभर अशा रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सर्वस्वाचा त्याग केलेल्या ऋषी-मुनी आणि संत यांना कधीच मनोविकार झाला नाही. याउलट ते नेहमी सत्-चित् आनंदात असायचे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘अंधारामुळे प्रकाशाचे, दुर्गंधामुळे सुगंधाचे आणि वेड्यामुळे शहाण्याचे महत्त्व कळते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले