ओटावा (कॅनडा) : कॅनडाच्या संसदेतील दिवाळी उत्सवाचा कार्यक्रम रहित करण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचे कॅनडाच्या विरोधी पक्षनेत्याने एक निवेदन जारी करत म्हटले आहे. विरोधी पक्षनेते पियरे पॉइलीव्हरे यांच्या कार्यालयाने म्हटले की, दिवाळी उत्सव रहित केल्याचे वृत्त चुकीचे आहे. ‘कन्झर्व्हेटिव्ह कॉकस’कडून हा महोत्सव आयोजित केला जाईल; मात्र उत्सवाच्या कार्यक्रमाच्या वेळेत थोडा पालट करण्यात आला आहे. दिवाळी दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांसमवेत साजरी केली जाणार आहे.’ कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार टॉड डोहर्टी यांनी दिवाळी उत्सवाचे आयोजन केले आहे.
So, @PierrePoilievre’s office has clarified the situation regarding the Diwali celebrations on parliament hill. Please see the image below.
Whoever sent out the letter that caused this controversy appears to have acted in haste: there WILL be a Diwali celebration as per normal. pic.twitter.com/dKNXaa8Zf1
— Darshan Maharaja (@TheophanesRex) October 31, 2024
भारतासमवेत चालू असलेल्या राजनैतिक अडथळ्याच्या पार्श्वभूमीवर दिवाळी साजरी करण्याचे रहित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. २३ वर्षांपासून सातत्याने पार्लमेंट हिलवर दिवाळी उत्सवाचे आयोजन केले जात आहे.