Karnataka Minister Z A Khan : (म्हणे) ‘हिंदु धर्मादाय विभाग आणि वक्फ बोर्ड हे वेगळे नाहीत !’ – जमीर अहमद खान, अल्पसंख्यांक कल्याण मंत्री, कर्नाटक

कर्नाटकचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमीर अहमद खान यांचे वक्तव्य

अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमीर अहमद खान

बेंगळुरू (कर्नाटक) – हिंदु धर्मादाय विभाग आणि वक्फ बोर्ड हे वेगळे नाहीत. आम्ही ‘अल्ला’ म्हणतो, तुम्ही ‘देव’ म्हणता. एवढाच काय तो भेद आहे. (हा एकच भेद नाही, तर असे असंख्य भेद आहेत. त्याचा पाढा येथे वाचायचा झाला, तर शब्द अपुरे पडतील. हे बहुतेक हिंदूंना ठाऊक आहे ! – संपादक) राजकारणात येऊन जातीय गणित करणारी व्यक्ती मी नाही. (असा देशात एकही राजकारणी नाही. ‘खोटे बोला; पण रेटून बोला’ याच वृत्तीचे बहुतेक राजकारणी असतात ! – संपादक) मी मुसलमान असण्याच्या आधी एक भारतीय आहे. आपल्या देशातील आणि राज्यातील सर्व समाजांना एकत्र घेऊन जाणारा खरा राजकारणी आहे. (ज्या टिपू सुलतानने एका दिवसात एक लाख हिंदूंना बाटवून मुसलमान केले, त्याच्याविरोधात जमीर अहमद बोलण्याचे धाडस करू शकतात का ? जर करू शकत असतील, तरच ते दोन्ही समाजांना एकत्र घेऊन जाणारे राजकारणी आहेत, असे म्हणता येईल ! – संपादक) भाजप नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या सरकारने विजयपुरा जिल्ह्यातील सहस्रावधी एकर भूमींच्या मालकांना नोटिसा दिल्या नाहीत. केवळ ११ एकर भूमींच्या मालकांना नोटिसा दिल्या आहेत. अनधिकृतपणे नोटिसा दिल्या, तर कारवाई केली जाईल, असा दावा कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे वक्फ आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री जमीर अहमद खान यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

जमीर अहमद खान यांनी केलेले वक्तव्य अगदी खरे आहे. दोघांचा उद्देश एकच आहे. सरकारनियंत्रित हिंदु धर्मादाय संस्था हिंदूंच्या मंदिरांना मिळालेल्या देवनिधीत अफरातफर करते, तर वक्फ बोर्ड हिंदु मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्ता या स्वत:ची संपत्ती असल्याचा दावा करते. यावर आळा घालण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !