परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘कुठे बुद्धीगम्य ज्ञान शिकवणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे बुद्धीलय शिकवणारे अध्यात्मशास्त्र ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कुठे बुद्धीगम्य ज्ञान शिकवणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे बुद्धीलय शिकवणारे अध्यात्मशास्त्र ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात, तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘मी हे उद्या करीन’ आणि ‘भगवंता, उद्या हे माझ्याकडून करवून घे’ या दोन्हींत भेद आहे. यासाठी ‘हे भगवंता, उद्या आपल्याला हे करावयाचे आहे आणि ते तू माझ्याकडून करवून घे’, अशी प्रार्थना करावी. अनुसंधानाने सामर्थ्य निर्माण होते.’
‘विज्ञानाचा खरा अभ्यास केलेल्यांनाच विज्ञानाच्या मर्यादा कळतात. इतर तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी विज्ञानाला डोक्यावर घेऊन नाचतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पैसे अशाश्वत आहेत. संतांनी दिलेला आशीर्वाद अखंड टिकणारा आहे. अखंड म्हणजे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत, तोपर्यंत टिकणारा आहे.
‘कुठे पृथ्वीवर राज्य करण्याचे ध्येय असणारे काही पंथ, तर कुठे ‘प्रत्येकाला ईश्वरप्राप्ती व्हावी’, हे ध्येय असणारा महान हिंदु धर्म !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘भारतात ‘भारतरत्न’ सर्वोच्च पद आहे. जगात ‘नोबेल प्राईज’ सर्वोच्च पद आहे, तर सनातन उद्घोषित करत असलेली ‘जन्म-मृत्यूतून सुटका’ आणि ‘संत’ ही पदे ईश्वराच्या विश्वात सर्वांत महत्त्वाची आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘दहा सर्वसाधारण व्यक्तींपेक्षा एका पेहेलवानात अधिक शक्ती असते. त्याप्रमाणे साधना न करता राष्ट्रकार्य करणार्यांपेक्षा राष्ट्रकार्य करणार्या भक्तामध्ये अनेक पटींनी अधिक शक्ती असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘बुद्धीप्रामाण्यवाद्यांनो आणि विज्ञानवाद्यांनो, ‘वैज्ञानिकांना शोध लावण्याची बुद्धी कुणी दिली ?’, याचा कधी विचार केला आहे का ? ती बुद्धी ईश्वराने दिली आहे. असे असतांना ‘ईश्वर नाही’, असे कुणी खरा बुद्धीवान म्हणेल का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सहस्रो वर्षांपूर्वी ऋषीमुनींनी अंकगणित, खगोलशास्त्र, वास्तूशास्त्र, आरोग्यशास्त्र, विमानउड्डाणाचे शास्त्र, नौकानयनशास्त्र इत्यादींच्या संदर्भात आधुनिक वैज्ञानिक उपकरणांविना मूलगामी शोध लावले . . . यासाठीच बहुतांशी वैज्ञानिक संशोधनांचे खरे जनक भारतीय ऋषीमुनीच आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले