Badaun Rape : बदायू (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणाकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर वर्षभर बलात्कार

आतंकवाद्याशी संबंध असल्याचे सांगून कुटुंबाला मारून टाकण्याची दिली धमकी

बदायू (उत्तरप्रदेश) – बदायू जिल्ह्यातील सहसवान शहरात महंमद फॅजी याने १६ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीवर वर्षभर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फॅजीने पीडितेचे अश्लील व्हिडिओ बनवून तिला धमकावले. एवढेच नव्हे, तर फॅजीने पीडितेवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकला आणि त्याचे आतंकवाद्यांशी संबंध असून कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात पोचून आरोपीच्या अटकेची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी फॅजी याला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी फॅजीवर यापूर्वीही गुन्हेगारी स्वरूपाचे खटले प्रविष्ट आहेत.

संपादकीय भूमिका

आता अशा गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा देणे आवश्यक झाले आहे ! सरकारने तसा कायदा केला पाहिजे !