
मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ९ पैकी ६ खासदार फुटले आहेत. ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश आष्टीकर, संजय जाधव आणि भाऊसाहेब वाकचौरे अशी त्यांची नावे आहेत. फुटलेले खासदार शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. १६ जूनच्या मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहली येथे पोचले होते. राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे ३ खासदार अद्यापही ठाकरे गटात आहेत.
उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटातून फुटलेल्या खासदारांनी व्यक्त केली आहे. खासदार फुटल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन फुटलेल्या खासदार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.
फुटलेल्या खासदारांनी १६ जून या दिवशी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना वेगळा गट स्थापन करण्यासाठीचे पत्र दिले होते. १७ जून या दिवशी लोकसभेच्या अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली. ठाकरे गटातून वेगळे झालेल्या खासदारांनी ते कोणत्या पक्षात सहभागी होणार ?, याविषयी अद्याप भूमिका घोषित केलेली नाही. येत्या १९ जून या दिवशी शिवसेनेचा वर्धापनदिन आहे. त्या दिवशी हे खासदार शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठाकरे गटाच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट !

१७ जून या दिवशी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि अरविंद सावंत यांनी संजय राऊत यांच्यासह लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. याविषयी संजय राऊत म्हणाले, ‘‘उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बैठक आयोजित केली आहे. बैठकीला उपस्थित रहाण्यासाठी सर्व खासदारांना पक्षादेश पाठवला आहे. या पक्षादेशाचे सर्व खासदारांनी पालन करावे, तसेच गटाच्या खासदारांचे म्हणणे ऐकून घ्यावे’, अशी भूमिका लोकसभेच्या अध्यक्षांकडे आम्ही मांडली.’’
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !
वारीतील दुर्घटनाग्रस्त वारकर्यांसाठी शासन राबवणार ‘विठ्ठल-रखुमाई वारकरी योजना’ !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी