
लंडन (ब्रिटन) – काही दिवसांपूर्वी ब्रिटनने रशियाशी संबंधित एका तेलवाहू नौकेवर कारवाई करत भारतीय कॅप्टन अजय पंत यांना अटक केली होती. आता याला प्रत्युत्तर म्हणून रशियाने त्याची युद्धनौका ‘इंग्लिश चॅनल’मध्ये (खाडीमध्ये) तैनात केली आहे. रशियाच्या नौदलाच्या ‘डमिरल ग्रिगोरोविच’ या नौकेने ब्रिटीश झेंडा असलेल्या एका लहान नौकेसमोर चेतावणी म्हणून गोळीबार केला; मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर नौकेने तिचा मार्ग पालटला. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयानेही या घटनेला दुजोरा दिला.
कॅप्टन पंत यांच्यावर ब्रिटनच्या ‘नॅशनल क्राईम एजन्सी’ने रशियाकडून प्रतिबंधित तेल तिसर्या देशात पोचवल्याचा आणि ब्रिटीश निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवला आहे. त्यांना साऊथॅम्प्टन दंडाधिकारी न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे.
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
कर्नाटक : न्यायाधिशांच्या खुर्चीवर करणी केल्याच्या आरोपा प्रकरणी महिलेला अटक