७ आतंकवाद्यांना अटक
पाकिस्तानमधून केला जात होता अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे यांचा पुरवठा
(देहली-एन्.सी.आर्. म्हणजे नॅशनल कॅपिटल रिजन – राष्ट्रीय राजधानी क्षेत्र)

नवी देहली – देहली पोलिसांच्या विशेष पथकाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’साठी (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) काम करणार्या ७ आतंकवाद्यांना अटक केली आहे. हे आतंकवादी पाकिस्तानात बसलेले हँडलर (भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणारे लोक) शाहजाद भट्टी आणि अजमल गुज्जर यांच्या आदेशानुसार देहली-एन्.सी.आर्.मध्ये मोठ्या आतंकवादी आक्रमणाच्या सिद्धतेत होते. त्यांना पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पाकिस्तानी शस्त्रास्त्रे पुरवली जात होती. या गटाला पाकिस्तानकडून अमली पदार्थांचाही पुरवठा होत असे. या सर्वांना पैशांचे आमीष दाखवून या कृत्यात सहभागी करून घेण्यात आले होते.
🚨 Major Terror Plot Foiled in Delhi-NCR! 🚨
Delhi Police have arrested 7 terrorists planning a massive attack in the national capital region, acting on orders from Pakistan-based handlers Shahzad Bhatti and Ajmal Gujjar.
Key highlights:
💊 Narcotics & weapons were being… pic.twitter.com/xpNFGcSQE5— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
१. अटक केलेल्यांमध्ये टेक्नो सिटी येथील दीपक अग्रोला, गाझियाबादच्या लोनी येथील रहिवासी अनस त्यागी, मोहित उपाख्य योगी, आरिफ उपाख्य प्रधान, जतन आणि साबीर यांचा समावेश आहे. (अटक करण्यात आलेल्यांची काही नावे हिंदु आहेत. यावरून हिंदूंचा बुद्धभेद करून त्यांचे धर्मांतर करून त्यांना आतंकवादी बनवणारी टोळी सक्रीय आहे का, याचे अन्वेषण होणे आवश्यक ! – संपादक)
२. याव्यतिरिक्त पंजाबच्या फतेहगड साहिब येथील करणवीर सिंह यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून ५ पिस्तूल, ४१ जिवंत काडतुसे, १ स्कॉर्पिओ गाडी, ७ भ्रमणभाष संच आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत.
३. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपींनी देहली-एन्.सी.आर्.मधील अनेक संवेदनशील ठिकाणे, गर्दीची ठिकाणे आणि काही धार्मिक नेत्यांची रेकी (पहाणी) केली होती. या ठिकाणांची छायाचित्रे आणि व्हिडिओ पाकिस्तानात पाठवण्यात आले होते, जेणेकरून मोठा घातपात घडवून आणता येईल.
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ