
तुळजापूर – धाराशिव जिल्ह्यातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री असलेल्या (नवीन) बसस्थानकात महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. येथील नवीन बसस्थानकात पुढील असुविधा आढळल्या.

१. बसस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून चोरीच्या घटनांना वाव मिळत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे. पोलीस चौकी असतांनाही परिसरात पोलीस दिसून येत नाहीत.

Ground Report | Shri Tulja Bhavani (New) Bus Stand, Tuljapur
❌ CCTV cameras not working
❌ Broken benches
❌ Damaged information boards
❌ Stray dog menace
❌ Hanging electric wires
❌ Poor toilet & drinking water facilitiesImmediate inspection and… pic.twitter.com/DCZSqpECSF
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2026
२. बसस्थानकातील सूचना आणि सवलती यांचे अनेक फलक फाटलेल्या अवस्थेत आहेत. गाड्यांच्या वेळापत्रकाचे फलक खाली लावण्यात आल्याने प्रवाशांना माहिती नीट दिसत नाही. काही फलक खराब झाले आहेत.


३. प्रवाशांसाठी बसवण्यात आलेली अनेक बाके तुटली आहेत. फलाटावरील परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर आहेत. देशात भटक्या कुत्र्यांनी लोकांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना बसस्थानकाच्या परिसरात भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
४. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अस्ताव्यस्त लटकले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

५. स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रवाशांसाठी कोणतीही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

| तुळजापूर आगारातील सुविधांच्या संदर्भात प्रशासनाने सांगितले, ‘‘पुणे, संभाजीनगर आणि सोलापूर मार्गावर अतिरिक्त बस फेर्या चालू करण्यात आल्या आहेत, तर भाडे भरून वाहनतळाची सुविधाही लवकरच होणार आहे. स्वच्छतागृहाच्या सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रवाशांसाठी प्रथमोपचार कक्ष आणि प्रथमोपचार पेटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बसस्थानकात सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. ‘नाथ जल’च्या पाण्याच्या बाटल्या निर्धारित दरात विक्री करण्यासाठी संबंधितांना कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.’’ |
बसस्थानकांच्या दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह पाठवा !आपल्या भागातील बसस्थानकेही अस्वच्छ असल्यास, पिण्याचे पाणी, बसण्यासाठीची बाकडी, कचराकुंड्या अशा किमान सुविधाही नसल्यास, बसस्थानकांच्या अशा दुरावस्थेची माहिती छायाचित्रांसह ‘सनातन प्रभात’साठी ‘९२२५६३९१७०’ या ‘व्हॉट्सॲप’ क्रमांकावर पाठवा. बसस्थानकांची दयनीय स्थिती प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करा ! हे वाचा → SANATAN PRABHAT EXCLUSIVE : बोरीवली (मुंबई) येथील नॅन्सी एस्.टी. बसस्थानकात स्वच्छतेची ‘एैशी कि तैशी’ !नागरिकांना आवाहन !‘बसस्थानकांची स्वच्छता’ हे जसे एस्.टी. महामंडळाचे दायित्व आहे, तसेच ‘सुजाण नागरिक’ म्हणून आपलेही दायित्व आहे. ‘एस्.टी. ही सर्वसामान्यांचा आधार आहे’, याची जाणीव ठेवून बसस्थानके स्वच्छ-सुंदर राखण्यासाठी प्रत्येक नागरिकानेही या अभियानामध्ये योगद्यान द्यावे. सूचना नोंदवा !वल्लभनगर येथील बसस्थानकाच्या दु:स्थितीविषयी माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘https://msrtc.maharashtra.gov.in/GeneralPages/Suggestions.aspx’ या लिंकवर ‘सनातन प्रभात’ने नोंदवली आहे. आपणही आपली सूचना त्वरित नोंदवा ! |
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
आषाढी यात्रेसाठी ५ सहस्र ५०० विशेष बसगाड्यांची सुविधा ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार