‘पवित्र पाणी’ प्यायल्याने रोग बरा होत असल्याचा दावा !
लोकांची फसवणूक आणि दिशाभूल करणार्यांना सरकारने कारागृहात टाकणे आवश्यक !

पुणे – पवित्र पाणी प्यायल्याने कर्करोग, ट्यूमर असे असाध्य व्याधी बर्या होतात, अशी बतावणी करणारे पास्टर (ख्रिस्ती धर्मप्रचारक) केनेथ पॉल सिल्वे यांच्यासह ८ जणांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या असलेल्या महिलेने तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
१. ख्रिस्ती धर्मगुरु कोंढवा येथील प्रार्थनागृहात आले होते. तक्रारदार महिला मैत्रिणीसह तेथे उपस्थित होत्या. तेथील स्वयंसेवकांनी प्रत्येकी २० रुपये घेऊन प्लास्टिकच्या बाटलीत पाणी दिले.
२. ‘कोणताही आजार झाला असेल, तर त्या भागावर हे पाणी लावा. त्यामुळे आजार अल्प होतील’, असे त्यांनी सांगितले.
३. धर्मगुरूंनी सांगितले की, शरिराच्या ज्या भागात आजार आहे, त्या भागावर उजवा हात ठेवा. कर्करोग, ट्यूमरसह कोणत्याही आजारातून देव तुम्हाला बरे करील.’’
४. तक्रारदार महिलेसह तिच्या मैत्रिणीनेही याचे भ्रमणभाषवर चित्रीकरण केले. तेव्हा तेथील महिला स्वयंसेवकांनी त्यांना चित्रीकरण करण्यास मनाई केली. त्यांना धक्काबुक्की करून भ्रमणभाषवरील चित्रीकरण नष्ट (डिलीट) केले. पोलिसांनी धर्मगुरूंसह ८ जणांविरुद्ध ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्या’सह इतर संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवला.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित