हिंदुत्वनिष्ठ दिनेश फलाहारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून केली मागणी
चौकशी झाली नाही, तर न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्याची दिली चेतावणी

मथुरा (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील दानपेटीतील चोरीच्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. अशातच आता मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मस्थानावर मिळणार्या देणगीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ नेते दिनेश फलाहारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रक्ताने पत्र लिहून केली आहे. ‘जर तुम्ही चौकशी केली नाही, तर आम्ही अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. विशेष म्हणजे फलाहारी यांनी स्वतः ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’ची स्थापना केली असून ते श्रीकृष्णजन्मभूमी वादात पक्षकार म्हणून खटला लढत आहेत.
🚨 Donation Scam Allegations Reach Mathura? 🚩
After the recent donation scandal controversy at Shri Ram Mandir, Ayodhya, fresh allegations have surfaced regarding Shri Krishna Janmasthan in Mathura.
Activist Dinesh Falahari has written a letter in blood to CM Yogi Adityanath,… https://t.co/90yTmm4D5c pic.twitter.com/tb1OxkFpMU
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 17, 2026
एकेकाळी दुचाकीवर फिरणारे व्यवस्थापन समितीचे सदस्य आज कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांतून फिरतात ?
फलाहारी यांनी पत्रात लिहिले की, जेव्हा जेव्हा मंदिराच्या दानपेट्या उघडल्या जातात, तेव्हा तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले जातात. रुपये, दागिने, सोने, चांदी, हिरे-जवाहिर या सर्वांची लूट केली जाते. जे व्यवस्थापन समितीचे सदस्य पूर्वी दुचाकी वाहनावरून येत होते, ते आज कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांतून फिरतात. त्यांच्याकडे आता कोट्यवधी-अब्जावधी रुपयांचे बंगले, कोठ्या आणि फार्महाऊस (शेतघर) आहेत. त्यांनी उत्तराखंडमध्येही भूमी खरेदी केली आहे. कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेशी हा खेळ होत आहे आणि हे अत्यंत दुःखद आहे. (जर या दाव्यात तथ्य असेल, तर हा अक्षम्य अपराध आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याची प्राधान्याने चौकशी करावी, अशी श्रीकृष्णाच्या भक्तांची प्रार्थना ! – संपादक)
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी