Muslim man arrested for spying for Pakistan : जैसलमेर (राजस्थान) येथून पाकसाठी हेरगिरी करणार्‍या मुसलमानाला अटक

सीमेजवळील रस्त्यावर दुकान थाटून करत होता सैन्याच्या हालचालींची हेरगिरी

मुस्ताक अली

जैसलमेर (राजस्थान) – भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या जैसलमेर जिल्ह्यातून पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’साठी (इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) हेरगिरी केल्याच्या प्रकरणी मुस्ताक अली याला अटक करण्यात आली. तो सुमारे २ वर्षांपासून पाकिस्तानातील ‘हँडलर्स’च्या (आतंकवादी कारवाया करण्यासाठी नियंत्रण आणि संचालन करणार्‍या लोकांच्या) संपर्कात होता आणि संवेदनशील माहिती पुरवत होता.

अली सामाजिक माध्यमांद्वारे पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात आला होता. त्याला सीमा क्षेत्राकडे जाणार्‍या प्रमुख मार्गावर दुकान चालवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते. तो दुकानाच्या आडून सीमा सुरक्षा दल आणि भारतीय सैन्य यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत असे. सैनिकांची ये-जा, सैनिकी वाहनांच्या हालचाली आणि सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित माहिती गोळा करून पुढे पाठवली जात होती. तो पैशासाठी हेरगिरी करत होता.
मुस्ताक अली एकटाच हेरगिरी करत होता कि त्याच्याशी इतर जण कुणी जोडले होते ? याची चौकशी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना सरकारने भर चौकात फाशी दिली पाहिजे !