आतंकवादी कारवाया करण्यासाठी योजना आखणार्या महंमद फराजकडून पोलिसांना मिळाली महत्त्वपूर्ण माहिती
देवबंद (उत्तरप्रदेश) येथील मदरशात झाले शिक्षण
(‘लोन वूल्फ’ म्हणजे ‘एकट्याने आक्रमण करणारा’)

भोपाळ (मध्यप्रदेश) – येथून अटक करण्यात आलेल्या ३५ वर्षीय महंमद फराजच्या अन्वेषणातून मध्यप्रदेश आतंकवादविरोधी पथकाला महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. फराज हा कोरोना महामारीच्या काळापासून इंटरनेटवर कट्टरपंथी साहित्य शोधत होता आणि पुढे तो आतंकवादी बनला. त्याचा उद्देश ‘लोन वूल्फ’ आक्रमणकर्ते सिद्ध करणे हा होता. तो अफगाणिस्तानला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी फराजला १२ जूनला येथील काँग्रेसनगर (काझी कँप) भागातून अटक केली. ४ दिवसांच्या चौकशीनंतर विशेष न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
🚨 Mohammad Faraz was preparing individuals across the country for ‘lone wolf’ terror attacks.
Police investigations have reportedly revealed that Faraz, who was planning terrorist activities, received education at a madrasa in Deoband, Uttar Pradesh.
If any institution is… pic.twitter.com/aDnlYAlADt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 18, 2026
अन्वेषणात असे समोर आले की, पश्चिम उत्तरप्रदेशातील देवबंद येथे असलेल्या एका मदरशात शिक्षण घेतलेल्या फराजला आतंकवादी साहित्याचे वाचन करण्यात आणि त्यांच्याविषयी व्हिडिओ पहाण्यात रूची निर्माण झाली. कालांतराने त्याचा संपर्क एका विदेशी ‘हँडलर’शी (आतंकवाद्यांमध्ये समन्वय करणारी व्यक्ती) झाला, जो पाकमधून कार्यरत असल्याचा संशय आहे. येथूनच तो कट्टरतावादी बनण्याची प्रक्रिया अधिक वेगवान झाली.
फराजच्या भ्रमणभाषात सापडलेल्या गोष्टी अशा…
१. अरबी भाषेतील जिहादी साहित्य
२. शेकडो व्हिडिओ
३. आतंकवादी संघटनांशी संबंधित प्रचार साहित्य
४. मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ
५. विविध देशांतील आतंकवादी प्रशिक्षणाची दृश्ये
६. कट्टरपंथी वक्त्यांची भाषणे
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी