परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘विज्ञानाने विविध यंत्रे शोधून मानवाचा वेळ वाचेल असे केले; पण ‘त्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा’, हे न शिकवल्याने मानव पराकोटीच्या अधोगतीला गेला आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘डॉक्टर, अधिवक्ता यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का ? कसे ?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘अनंत कोटी ब्रह्मांडनायकाचे इतर पंथात असते, तसे एकेका पुस्तकात वर्णन करता येईल का ? म्हणूनच हिंदु धर्मात सहस्रो ग्रंथ आहेत. त्यांतून पूर्ण माहिती मिळते.’ – (परात्पर गुरु)डॉ. आठवले
‘पाश्चात्त्य शिक्षण कोणत्याही समस्येच्या मूळ कारणांपर्यंत, उदा. प्रारब्ध, अनिष्ट शक्ती, काळमहात्म्य येथपर्यंत जात नाही. क्षयरोग्याला क्षयरोगाचे जंतू मारणारे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे त्यांचे उपाय आहेत !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सर्व रोगांना एकच औषध किंवा सर्व दाव्यांना एकच कायदा नसतो; पण राष्ट्र आणि धर्म यांच्या सर्व समस्यांना एकच उत्तर आहे अन् ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘हिंदु सोडून इतर धर्मांतील एकही जण ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणत नाही. ‘सर्वधर्मसमभाव’ म्हणणार्या हिंदूंची स्थिती केविलवाणी झाली आहे, तर न म्हणणार्या इतर धर्मांतील सर्वांची स्थिती हिंदूंपेक्षा पुष्कळ चांगली आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयाण करतात, त्याप्रमाणे साधना आणि हिंदु धर्म यांच्या शिक्षणासाठी जगभरचे जिज्ञासू अन् साधक भारतात येतात. असे असले, तरी भारतातील हिंदूंना हिंदु धर्माचे मूल्य नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘कलियुगातील मानवाकडून नाही, तर देवाकडून निवडले जावे’, अशी साधकांची इच्छा असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘निवडून येण्यासाठी राजकारण्यांना जनतेला खुश करावे लागते. याउलट साधना करणार्याला देव स्वतःहून निवडतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘वैयक्तिक जीवनासाठी अधिक पैसे मिळतात; म्हणून सर्वजण आनंदाने अधिक वेळ (ओव्हरटाईम) काम करतात; पण राष्ट्र आणि धर्म यांच्यसाठी १ घंटा सेवा करायला कुणीही सिद्ध नसतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले