रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला स्वप्नात दिसलेले दृश्य !

मला स्वप्नात दिसले, ‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात फिरत आहे. मी पहिल्या माळ्यावर आले. तिथे गुरुदेव २ साध्वींना मार्गदर्शन करत आहेत.

‘श्री गुरूंचे चरण’ ही जगातील सर्वांत सुरक्षित जागा !

‘सध्या आपत्काळामध्ये तरून जाण्याच्या दृष्टीने आपण सर्व जण प्रयत्न करत आहोत. आपण विविध ठिकाणी सुरक्षित जागा बघत आहोत, तसेच सौर ऊर्जा आणि विविध वस्तू यांची सिद्धता करत आहोत. हे सर्व करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘ही सिद्धता आपण आज्ञापालन म्हणून करायचीच आहे.

पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असण्यामागील अध्यात्मशास्त्र

आपण बर्‍याचदा पहातो की, पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असतो. असे असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील आणि सूक्ष्मातील अस्तित्वामुळे त्रास दूर होत असल्याच्या काळानुसार आलेल्या अनुभूती !

‘माझ्या जीवनात मोठी अडचण किंवा समस्या निर्माण झाली, तसेच माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर वाईट शक्तींची आक्रमणे झाली, तर केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच ती दूर झाली आहेत अन् आताही होत आहेत. या सर्व प्रक्रियेत मी अनुभवलेले विविध टप्पे आणि मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची ज्योतिषशास्त्राद्वारे उलगडलेली वैशिष्ट्ये !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मूळ प्रकृती ‘द्विस्वभावी’ आहे. जिज्ञासा, संशोधकवृत्ती, तर्कशक्ती, बौद्धिक बळ इत्यादी वैशिष्ट्ये त्यांच्यात मूलतः होती.

नम्र, प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री. रोहन गायकवाड (वय २० वर्षे) !

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मागील काही मास मला सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवेअंतर्गत माझा रोहनदादाशी (श्री. रोहन गायकवाड यांच्याशी) संपर्क असायचा. तेव्हा मला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

‘व्यष्टी आणि समष्टी साधनेचे महत्त्व’ याविषयी देवाने सुचवलेली सूत्रे

गुरुदेवांनी सांगितलेल्या सूत्रांप्रमाणे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रामाणिक प्रयत्न केल्यास आपल्याला ईश्वराच्या चरणांपर्यंत लवकर पोेचता येईल अन् त्यांचे मन जिंकता येऊन आपल्यावर अखंड गुरुकृपा होईल.

कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

रामपूर (कर्नाटक) येथील कीर्तनकार आणि रामभक्त पू. सदानंद भस्मे महाराज यांचा देहत्याग !

येथील कीर्तनकार आणि रामभक्त सदानंद भस्मे महाराज यांनी २२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी वयाच्या ८२ व्या वर्षी शिवानंद कुटीर येथे देहत्याग केला.

रामनाथी आश्रमातील युवा शिबिरात सहभागी होण्याविषयी कोल्हापूर येथील कु. संजना कुराडे हिला आलेल्या अनुभूती !

मी पुष्कळ शरणागतीने प्रार्थना केली. त्यानंतर बाबांमधील नकारात्मकता न्यून झाल्याचे मला जाणवले आणि गुरुकृपेने त्यांनी मला शिबिराला जाण्यासाठी अनुमती दिली. त्याच क्षणी माझी भावजागृती झाली.