नम्र, प्रेमळ आणि तळमळीने सेवा करणारे वेळापूर (जिल्हा सोलापूर) येथील श्री. रोहन गायकवाड (वय २० वर्षे) !

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मागील काही मास मला सोलापूर येथील सनातनच्या सेवाकेंद्रात राहून सेवा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी सेवेअंतर्गत माझा रोहनदादाशी (श्री. रोहन गायकवाड यांच्याशी) संपर्क असायचा. तेव्हा मला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

श्री. रोहन गायकवाड

१. शांत स्वभाव

‘रोहनदादा कोणत्याही कठीण प्रसंगामध्ये शांत असतो. सेवा करतांना दादा शांत राहून सर्व निर्णय घेत असे. दादा सर्व साधकांशी शांतपणे बोलतो. त्यामुळे साधकांना दादाशी बोलतांना कोणत्याही प्रकारचा ताण किंवा दडपण येत नाही.

कु. देवदत्त व्हनमारे

२. दादा कोणत्याही वयोगटामधील साधकांशी नम्रतेने बोलतो.

३. परिस्थिती स्वीकारणे

दादाकडे बर्‍याच सेवा असतात. सेवा करतांना बर्‍याच वेळा काही साधकांना अकस्मात् अडचण येते किंवा वर्तमान परिस्थितीमध्ये निर्णय पालटतात, तरीही दादा सर्व परिस्थिती स्वीकारतो. ‘त्या परिस्थितीमध्ये आणखी योग्य काय करता येईल ?’, असा विचार दादा करतो.

४. प्रेमभाव

दादा फार प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे. तो पहिल्या भेटीमध्ये समोरील व्यक्तीला आपलेसे करून घेतो. साधकांनाही दादाशी बोलतांना त्याचा आधार वाटतो.

५. तळमळ

दादामध्ये गुरुसेवेची तीव्र तळमळ आहे. तो घरातील कामांत बराच व्यस्त असतो, तरीही तो कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाही.

६. जाणवलेला पालट

पूर्वी दादाला ‘प्रतिमा जपणे’, या अहंच्या पैलूमुळे मनमोकळेपणाने बोलणे जमत नसे; परंतु त्याने त्यावर प्रयत्न केले. आता तो मनातील अयोग्य विचारही सांगतो आणि त्यावर योग्य दृष्टीकोन विचारतो.

‘गुरुदेवांच्या कृपेमुळे मला दादाचा सहवास मिळाला आणि त्याचे गुण लक्षात आले’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !’

– कु. देवदत्त व्हनमारे (वय १७ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), पुणे (२.९.२०२१)