सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या स्थुलातील आणि सूक्ष्मातील अस्तित्वामुळे त्रास दूर होत असल्याच्या काळानुसार आलेल्या अनुभूती !

अनुभूतीद्वारे साधकांना आधार देणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘माझ्या जीवनात मोठी अडचण किंवा समस्या निर्माण झाली, तसेच माझे शरीर, मन आणि बुद्धी यांवर वाईट शक्तींची आक्रमणे झाली, तर केवळ प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच ती दूर झाली आहेत अन् आताही होत आहेत. या सर्व प्रक्रियेत मी अनुभवलेले विविध टप्पे आणि मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. रोहित साळुंके

१. अनुभवलेले विविध टप्पे

टप्पा १ – प.पू. डॉक्टरांना मोठी अडचण किंवा त्रास यांविषयी विचारताक्षणीच ते दूर होणे (वर्ष २०१३ पर्यंत)
टप्पा २ – प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रासमोर त्यांना शरण जाऊन अडचण सांगितल्यावर ती आपोआपच दूर होणे (वर्ष २०१८ पर्यंत)
टप्पा ३ – प.पू. डॉक्टर सूक्ष्मातून समोर बसले आहेत आणि त्यांच्या चरणांशी बसून मन शरणागत झाल्यानंतर अडचण दूर होऊन मन शांत होणे (वर्ष २०२० पर्यंत)
टप्पा ४ – प.पू. डॉक्टरांचे स्मरण करून त्यांना शरण गेल्यानंतर अडचण दूर होणे (वर्ष २०२१ पर्यंत)

२. आलेल्या अनुभूती

२ अ. त्रास होऊ लागल्यावर प.पू. डॉक्टरांच्या नावाचा जप होऊन त्रास न्यून होणे : ‘वर्ष २०२२ पासून अनिष्ट शक्तींचे आक्रमण होत आहे किंवा शारीरिक त्रास वाढत आहेत’, असे लक्षात आल्यानंतर ‘प.पू. डॉक्टर । प.पू. डॉक्टर ।’, असा नामजप चालू होऊन त्रास न्यून होतो.

२ आ. प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातील कार्य आता पुष्कळ प्रमाणात वाढले असून ते निर्गुणातून चालू असल्याची प्रचीती गुरुकृपेमुळे येणे : ‘प.पू. डॉक्टरांचे सूक्ष्मातील कार्य आता पुष्कळ प्रमाणात वाढले असून ते निर्गुणातून चालू आहे’, याविषयी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतून, तसेच विविध संतांच्या तोंडूनही मी ऐकले आहे. या सर्वांची प्रचीती मला प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळेच अनुभवायला मिळत आहे.

‘प.पू. डॉक्टर सनातनच्या प्रत्येक साधकासमवेत येणार्‍या भीषण आपत्काळातच नव्हे, तर त्यानंतरही असणारच आहेत. मीच त्यांचे भावपूर्ण स्मरण करायला पुष्कळ अल्प पडतो’, हेही यांतून मला शिकायला मिळाले.

प.पू. डॉक्टर, आपल्या अस्तित्वाची जाणीव मला अखंड असू दे आणि मला आपले अस्तित्व सातत्याने अनुभवता येऊ दे’, अशी आपल्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’

– श्री. रोहित साळुंके, खडपाबांध, फोंडा, गोवा. (१०.४.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक