पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असण्यामागील अध्यात्मशास्त्र

आपण बर्‍याचदा पहातो की, पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असतो. असे असण्यामागील आध्यात्मिक कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

कु. मधुरा भोसले

अ. भांगाकडे वातावरणातील सत्त्वप्रधान लहरी आकृष्ट होऊन त्या टाळूद्वारे ग्रहण केल्या जाणे

पुरुषांच्या टाळूचा डावा भाग संवेदनशील असतो आणि स्त्रियांच्या टाळूचा मधला भाग संवेदनशील असतो. पुरुषांचा भांग डावीकडे आणि स्त्रियांचा भांग मध्यभागी असल्यामुळे त्यांच्या भांगाकडे वातावरणातील सत्त्वप्रधान लहरी आकृष्ट होऊन त्या टाळूद्वारे ग्रहण केल्या जातात. अशा प्रकारे पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही सात्त्विकतेचा लाभ होतो. त्यांच्या डोक्याभोवती सात्त्विक शक्तीचे संरक्षककवच निर्माण होते.

पुरुषांनी डावीकडे भांग पाडणे

आ. पुरुष आणि स्त्रिया यांच्या भांगामुळे त्यांच्या विविध नाड्या चालू होऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे

पुरुषांचा भांग त्यांच्या डावीकडे असल्यामुळे त्यांची चंद्रनाडी आणि स्त्रियांचा भांग त्यांच्या मध्यभागी असल्यामुळे त्यांची सुषुम्नानाडी चालू होते. त्यामुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.

स्त्रियांनी मध्यभागी भांग पाडणे

इ. पुरुषांचा भांग त्यांच्या डावीकडे आणि स्त्रियांचा भांग त्यांच्या मध्यभागी असणे यांतील भेद

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७.२०१९)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.