प्रतिदिन प्रभातकाळी शुभ संकल्प करा !

अ. मला जसे व्हायचे आहे, तसा मी आहेच. माझ्यात काही कमतरता असेल, तर ती मी अवश्य काढून टाकीन.

आ. ‘माझा मृत्यू कधी होतच नाही. मृत्यू होतो तो शरिराचा होतो’, असे सदैव चिंतन करत रहा.

इ. ‘मी कधीही दुर्बल होत नाही. दुर्बल आणि सबळ शरीर असते. मी तर मुक्त आत्मा आहे. मी परमात्म्याचा चैतन्यमय सनातन अंश आहे. मी सद्गुरुतत्त्वाचा आहे. हा संसार मला हलवू शकत नाही, झटका देऊ शकत नाही. झटका दिला जातो शरिराला, विचलित होते मन. शरीर आणि मन यांना पहाणारा मी चैतन्यरूप आत्मा आहे. घराचा विस्तार, दुकानाचा विस्तार, राज्य किंवा राष्ट्र यांच्या सीमा वाढवून मला मोठा म्हणवून घेण्याची आवश्यकता नाही. मी तर असीम (सीमा नसलेला) आत्मा आहे. सर्व सीमा माया आणि अविद्या यांत आहेत. माझ्या आत्मस्वरूपात तर असीमता आहे. मी तर या असीम राज्याची प्राप्ती करून घेईन आणि निश्चिंत जगीन. जे लोक सीमा सुरक्षित करून अहंकार वाढवून जगले, ते लोकसुद्धा शेवटी (जगाची) सीमा सोडून निघून गेले; म्हणून अशा सीमांचे मला आकर्षण नाही. मी तर असीम आत्म्यामध्ये स्थित होऊ इच्छितो.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)