अर्थार्जनाचे नियम

प्रतिकात्मक छायाचित्र

१. ‘अतीसंपत्तीचा लोभ ठेवू नका.

२. संसार-व्यवहार चालवण्यासाठी बेफिकीर बनू नका.

३. अक्कल, बुद्धी वापरून, तसेच पुरुषार्थ आणि परिश्रम करून अर्थार्जन केले पाहिजे. अर्थार्जनासाठी पुरुषार्थ अवश्य करावा; पण धर्मानुकूल राहूनच ! गरीबांचे शोषण करून मिळवलेले धन सुख देत नाही.

४. लक्ष्मी त्यालाच प्राप्त होते जो पुरुषार्थ करतो आणि जो उद्योग करतो. लक्ष्मी आळशी माणसाचा त्याग करते. ज्याच्याजवळ लक्ष्मी असते, त्याला मोठमोठे लोक मान देतात.

५. लक्ष्मीजवळ घुबड बघायला मिळते. या घुबडाद्वारे आपल्याला संकेत मिळतो की, निगुर्‍या (गुरुहीन किंवा पोरक्या) लोकांजवळ लक्ष्मीबरोबरच अहंकाराचा अंधारही येतो. घुबड सावध करते की, नेहमी चांगल्या पुरुषांचीच संगती केली पाहिजे.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)