एका देवतेची पूजा, ही व्यष्टी साधना, तर धर्मकार्यासाठी अनेक देवतांची पूजा, ही समष्टी साधना !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधनेमध्ये ‘व्यष्टी साधना’ (स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाची साधना) आणि ‘समष्टी साधना’ (समाजाच्या उद्धारासाठी करावयाची साधना) असे दोन प्रकार असतात. देवपूजेलाही हा भाग लागू पडतो. आपण साधनेच्या ‘अनेकातून एकात येणे’ या तत्त्वानुसार आपली श्रद्धा अनेक देवतांमध्ये विभागली जाऊ नये; म्हणून केवळ एका देवतेची पूजा करत असू, तर हा ‘व्यष्टी साधने’चा भाग होतो आणि धर्मप्रसाराच्या कार्याला विविध देवतांचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी अनेक देवतांची पूजा करत असल्यास, ती ‘समष्टी साधना’ होते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले