सुवचने

१. ‘आत्मसाक्षात्कारी सद्गुरूंविना अन्य कुणावरही अतीविश्वास ठेवू नका आणि अतीसंशयही घेऊ नका.’

२. ‘आपल्यापेक्षा लहानांना भेटाल, तेव्हा करुणा ठेवा. आपल्यापेक्षा उत्तम व्यक्तींना भेटाल, तेव्हा हृदयात आदर ठेवा.’

३. ‘आत्मवेत्त्या संतांना भेटाल, तेव्हा हृदयात श्रद्धा, भक्ती आणि विनय ठेवा.’

४. ‘आपल्या बरोबरीच्या लोकांशी व्यवहार करण्याचा प्रसंग आल्यावर हृदयात भगवान श्रीरामांप्रमाणे प्रेम ठेवा.’

५. ‘अतीउद्धट लोक तुमच्या संपर्कात येऊन जर स्वतःला पालटू शकले नाहीत, तर अशा लोकांपासून थोडे दूर राहून आपला वेळ वाचवा.’

६. ‘नोकरांना आणि आश्रित लोकांना प्रेम द्या, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवा.

७. ‘अगदीच भोळे सदाशिव बनू नका आणि अतीचतुरही बनू नका. अति भोळेभाबडे बनाल, तर लोक तुम्हाला मूर्ख समजून धोका देतील. अती चतुर बनाल, तर संसारी आकर्षणांना बळी पडाल.’

८. ‘लोभी, मूर्ख आणि भांडखोर लोकांच्या संपर्कात येऊ नका.’

९. ‘त्यागी, तपस्वी आणि परोपकारी लोकांची संगत कधीही सोडू नका.’

१०. ‘कार्य सिद्ध झाल्यानंतर आणि यश मिळाल्यानंतर गर्व करू नका.’

११. ‘कार्यात अपयश आल्यास दुःखरूपी दरीत पडू नका.’

(साभार : ग्रंथ ‘सदा दिवाळी’)