‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

दापोली येथे २१ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

दापोली (रत्नागिरी), १६ फेब्रुवारी (वार्ता.) – सहस्रो हिंदु युवतींना उद्ध्वस्त करणारा ‘लव्ह जिहाद’, भारतीय अर्थव्यवस्थेवरील मोठे संकट ‘हलाल जिहाद’, वक्फ बोर्ड कायद्यामुळे वाढत असलेला ‘लँड जिहाद’ आणि हिंदूंवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी हिंदूंमध्ये जनजागृतीची आवश्यकता आहे. यासाठीच येत्या २१ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता येथील आझाद मैदानात हिंदु राष्ट्र-जागृती सभा होत आहे, या सभेला सर्व हिंदूंनी उपस्थित रहावे. ही हिंदु राष्ट्र-जागृती सभा हिंदूंच्या संघटनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांनी आज येथील पत्रकार परिषदेत काढले. या वेळी समितीचे श्री. परेश गुजराथी आणि सनातन संस्थेचे श्री. महेंद्र चाळके उपस्थित होते.

डावीकडून पत्रकारांना संबोधित करतांना श्री. विनय पानवळकर, श्री. परेश गुजराथी आणि श्री. महेंद्र चाळके

श्री. पानवळकर पुढे म्हणाले की,

या सभेत सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये अन् अधिवक्ता नीलेश सांगोलकर हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांविषयी माहिती, हिंदूंना प्रतिदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती आणि साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक, तसेच हिंदूंना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथांचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. सभेसाठी दापोली शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. सामाजिक माध्यमांतून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे.

या वेळी सभेच्या प्रसाराचा आढावा समितीचे श्री. परेश गुजराथी यांनी मांडला –

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ आज वाहनफेरी

१७ फेब्रुवारी २०२३ या दिवशी दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ शहरातून वाहनफेरी काढण्यात येणार आहे.

या फेरीचा आरंभ श्री काळकाई मंदिर येथून होणार असून या फेरीची सांगता केळसकर नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे.