आसनगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलला आग; प्रवाशांची धावपळ !

मुंबई – आसनगाव रेल्वे स्थानकाजवळील धावत्या लोकलमधून १६ फेब्रुवारीला अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. यामुळे भयभीत होऊन प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, तर काहींनी साखळी ओढून लोकल थांबवली. लोकलच्या ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येत परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर ही लोकल कारशेडला पाठवण्यात आली.