पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. प्रकल्पावर महापालिकेची कारवाई !

विनाअनुमती व्यवसाय, तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण करत होते !

पिंपरी (पुणे) – महापालिकेच्या हद्दीत विनाअनुमती व्यवसाय करणार्‍या पुनावळे आणि चिखली येथील आर्.एम्.सी. (रेडी मिक्स काँक्रिट) प्रकल्पावर महापालिकेने वायू अन् ध्वनी प्रदूषण करत असल्याने महापालिकेने कारवाई करून टाळे लावले. शहरातील आर्.एम्.सी. प्रकल्प मधून मोठ्या प्रमाणात उडणार्‍या धुळीमुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे, तसेच या प्रकल्पामधून निघणार्‍या आवाजामुळे ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातील तक्रारीही पर्यावरण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची नोंद घेऊन महापालिकेने पुनावळे आणि चिखली येथे प्रत्यक्ष पहाणी केली. त्या वेळी त्यांच्याकडे ‘ना हरकत’ दाखला आणि इतर आवश्यक असणारी, तसेच अनुमती असणारी कागदपत्रे नसल्याचे आढळले. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत विनाअनुमती व्यवसाय करणे, तसेच वायू आणि ध्वनी प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पर्यावरण विभागाने दिली आहे.

संपादकीय भूमिका 

  • उघडउघड विनाअनुमती व्यवसाय होत असतांना प्रशासन काय करत होते ?
  • नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कारवाई करणारे सूस्त प्रशासन काय कामाचे ?
  • आतातरी प्रशासन अशा प्रकारे अन्यत्र कुठे अवैध व्यवसाय चालू नाहीत ना ? हे पाहिल का ?