कर्नाटककडून कळसा-भंडुरा प्रकल्पांसाठी १ सहस्र कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद

कर्नाटकच्या म्हादई नदीवर उभारण्यात येणार्‍या कळसा-भंडुरा प्रकल्पांना दिलेली मान्यता ही केवळ तांत्रिक स्वरूपाची आहे.‘हायड्रोलॉजी’ आणि आंतरराज्य निकष यांनुसार ‘डी.पी.आर्.’ला मान्यता देण्यात आली आहे.

संग्रहालयाचे पावित्र्य नष्ट व्हावे, यासाठी कुणालाही अनुमती दिलेली नाही ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकाने उघडले असल्याने स्वातंत्र्यसैनिक संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांच्याकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. मद्यविक्रीचे दुकान बंद न केल्यास सत्याग्रहाला आरंभ करण्याची चेतावणी दिली आहे.

शिबिरासाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी उपस्थिती लावण्याचा आदेश मागे घ्यावा ! – काँग्रेस

काँग्रेसला पोटशूळ ! भाजप सरकार गोव्यातील पारंपरिक कार्निव्हल महोत्सवाला आळा घालत आहे आणि योगऋषी रामदेवबाबा यांच्या शिबिराला शिक्षक, ‘एन्.सी.सी.’, ‘एन्.एस्.एस्.’ आणि ‘स्काऊट अँड गाईड’ स्वयंसेवक यांना बंधनकारक करत आहे.

लोकांना रोग आणि रोगांवरील औषधे यांमधून मुक्ती देण्यासाठी योग शिबिराचे आयोजन ! – योगऋषी रामदेवबाबा

सनातन धर्म हा सर्वसमावेशक आहे आणि यामागे कोणताही राजकीय हेतू नाही. भारतियांच्या ‘डी.एन्.ए.’मध्ये (गुणसूत्रांमध्ये) रोग नव्हे, तर योग आहे. योगऋषी रामदेवबाबा यांचे सनातन जीवन शैली अंगीकारण्याचे आवाहन !

राज्यशासन अनुसूचित जातीच्या १०० विद्यार्थ्यांना नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण देणार !

शासकीय निधीतून लाभ देतांना विद्यार्थ्यांमध्ये समाज आणि राष्ट्र यांप्रती कर्तव्यभावना निर्माण होण्यावर शासनाने भर द्यावा !

तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित झालेल्या मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करावे !

अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाय यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. तालिबानी राजवटीमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या अफगाणी मुलींच्या शिक्षणासाठी भारताने साहाय्य करण्याची विनंती….

‘उस्मानाबाद’चे ‘धाराशिव’ नामांतर करण्यास हरकत नाही; मात्र ‘औरंगाबाद’चा विचार चालू !

नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महंम्मद अहमद, अण्णासाहेब खंदारे आणि राजेश मोरे यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अनुयायी यशवंतराव पाळंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – विद्याधरपंत नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

‘पाळंदे कुरियर’चे संस्थापक यशवंत पाळंदे यांचे वृद्धापकाळाने निधन !

पाळणा सोहळ्यासाठी येणार्‍या महिलांना विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करणार ! – शीतल तेली उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका

दूरच्या ठिकाणी रहाणार्‍या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

फलकांवरील माहिती पडताळणीनंतरच अनुमती देण्यात येणार ! – अंकुश शिंदे, पोलीस आयुक्त

शहरातील सार्वजनिक मंडळानी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नियमांचे पालन करून साजरी करावी. मंडळाच्या वतीने उभारण्यात येणार्‍या शिवजयंतीच्या फलकांवरील माहितीची पडताळणी केल्यानंतरच अनुमती दिली जाईल, असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी येथे व्यक्त केले.