स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे अनुयायी यशवंतराव पाळंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! – विद्याधरपंत नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान

‘पाळंदे कुरियर’चे संस्थापक यशवंत पाळंदे यांचे वृद्धापकाळाने निधन !

पुणे, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अनुयायी पाळंदे कुरिअरचे संस्थापक यशवंतराव पाळंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची आठवण म्हणजे सावरकरांचे ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ ग्राहक पेठेने सवलतीच्या दरात काढला होता, त्या वेळेस त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्व देशांत आपल्या कुरिअरच्या संस्थेकडून तो सर्व ग्राहकांना विनामूल्य पोचवला. ही त्यांची आठवण माझ्या मनात कायमची रुजली गेली. अशा थोर व्यक्तीस ‘सावरकर स्मृती प्रतिष्ठान’च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली ! अशा शब्दांत सावरकर स्मृती प्रतिष्ठानच्या विद्याधरपंत नारगोलकर यांनी पाळंदे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारतासह जगभरात कुरियर सेवा पुरवणार्‍या शहरातील प्रसिद्ध पाळंदे कुरियरचे संस्थापक यशवंत पाळंदे (वय ८२ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे पुत्र आशिष पाळंदे कुरियर आणि इतर व्यवसाय सांभाळत आहेत.