पाळणा सोहळ्यासाठी येणार्‍या महिलांना विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करणार ! – शीतल तेली उगले, आयुक्त, सोलापूर महापालिका

सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले

सोलापूर, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथे १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पाळणा सोहळ्यासाठी सहस्रो महिला आणि शिवभक्त एकत्र येतात. सोहळ्यानंतर महिलांना घरी जाण्यासाठी अडचण येते. दूरच्या ठिकाणी रहाणार्‍या महिलांना महापालिकेच्या वतीने विनामूल्य घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिक संख्येने महिला असलेल्या मार्गांची सूची आम्ही आयोजकांकडे मागितली आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली उगले यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.